आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल आजपासून 2 रुपयांनी स्वस्त, तेल कंपन्यांची घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पेट्रोल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोलच्या दरात लिटरमागे 1.68 रुपयांची कपात केली. ग्राहकापर्यंत मिळणारा कपातीचा प्रत्यक्ष लाभ 2.02 रुपये असेल. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उतरल्याने सरकारी कंपन्यांनी याचा प्रत्यक्ष लाभ ग्राहकांना देण्यासाठी हा निर्णय घेतला. 9 दिवसांपूर्वी पेट्रोलच्या दरात साडेसात रुपयांची ऐतिहासिक वाढ करण्यात आली होती. औरंगाबादेत आता पेट्रोलचा प्रतिलिटर दर 76.44 रुपये राहील.
24 मे रोजी पेट्रोलचे दर स्थानिक करांचा विचार करता 7.54 ते 10 रुपयांपर्यंत वाढले होते. याचे पडसाद देशभर उमटले. समाजातील सर्वच घटकांनी या दरवाढीला जोरदार विरोध केला होता. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि डाव्या पक्षांनी 31 मे रोजी भारत बंद पुकारला होता. सत्ताधारी यूपीए सरकारला पाठिंबा देणाºया तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकसारख्या पक्षांनीही दरवाढीच्या विरोधात निदर्शने केली होती.

दरवाढीचे कारण
24 मे रोजी पेट्रोलचे दर वाढले तेव्हा त्यापूर्वीच्या पंधरवड्यात गॅसोलिनचा सरासरी भाव 124.37 डॉलर प्रतिबॅरल होता. तेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 53.17 होते.
दरकपातीचे कारण
गेल्या पंधरवड्यात गॅसोलिनचा भाव 115.77 डॉलर प्रतिबॅरल इतका होता. तेल कंपन्यांनी कच्च्या तेलाचे उतरलेले हे भाव ग्राह्य धरले. त्या आधारे 1 जूनच्या आढाव्यात दरकपात करण्यात आली.
‘व्हॅट’मुळे पेट्रोल-डिझेलचा भडका; पेट्रोल, डिझेल महागले
जुन्या पेट्रोल कार होणार अधिक स्वस्त
पेट्रोल दरवाढीवर उत्तर द्याः उच्‍च न्‍यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश