आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photo Of Narendra Modi Missing On BJP Hordings In New Delhi

राजनाथ सिंह झाले मोदीमय, राष्‍ट्रीय परिषदेत तोंडभरुन स्‍तुति

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- नवी दिल्‍ली- भारतीय जनता पार्टीच्‍या राष्‍ट्रीय परिषदेत नरेंद्र मोदींचे गुणगान सुरुच आहे. गुजरातमध्‍ये सलग तीनवेळा सत्ता मिळवून नरेंद्र मोदींनी भाजपचा गौरव वाढविला असून त्‍यांचा विजय भाजपसाठी महत्त्वाचा आहे, असे सांगून भाजपचे अध्‍यक्ष राजनाथ सिंह यांनी स्‍तुति केली.

परिषदेच्‍या अखेरच्‍या दिवशी नरेंद्र मोदींचे सर्व नेत्‍यांनी उभे राहून स्‍वागत केले. तर स्‍वतः अध्‍यक्ष राजनाथ सिंह यांनी मोदींच्‍या गळ्यात मोठा पुष्‍पहार घातला. राजनाथ सिंह यांच्‍या तोंडून नरेंद्र मोदींची अशी काही स्‍तुति झाली की एका क्षणाला ते मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्‍हणून घोषणा करतात की काय, असेच वाटू लागले होते.

राजनाथ सिंह यांनी माजी अध्‍यक्ष नितिन गडकरींचे कौतूक केले. गडकरींनी पक्षासाठी चांगले काम केले असून तेच आम्‍हाला अध्‍यक्षपदी हवे आहेत. संपूर्ण पक्ष त्‍यांच्‍या पाठीशी आहे, असे राजनाथ सिंह म्‍हणाले.