आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : रणवीर सेनेच्या प्रमुखांची हत्या कशी झाली ते पाहा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारमधील 'रणवीर सेने'चा संस्‍थापक ब्रह्मेश्‍वर सिंह उर्फ बरमेसर मुखिया याची गोळी घालून हत्‍या करण्‍यात आली. आज पहाटे अज्ञात हल्‍लेखोरांनी भोजपूर जिल्‍ह्यातील आरा येथे त्‍याच्‍यावर गोळीबार केला. ब्रह्मेश्‍वर सिंह सकाळी फिरायला घराबाहेर पडला होता. त्‍याचवेळी हल्‍लेखोरांनी डाव साधला. ब्रह्मेश्‍वर याच्‍यावर तब्‍बल 40 गोळ्या झाडण्‍यात आल्या. त्यात तो जागेवरच गतप्राण झाला. या घटनेनंतर आरा येथे रणवीर सेनेचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी संतापाच्‍या भरात ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड सुरु केली. हजारोंच्‍या संख्‍येने कार्यकर्ते रस्‍त्‍यावर उतरले. हत्‍या झाली त्‍या स्‍थळापासून जवळच्‍या एका हरिजन वसतीगृहाला आग लावण्‍यात आली. याशिवाय काही ठिकाणी रस्‍ते आणि रेल्‍वे वाहतूकही आंदोलनकर्त्‍यांनी रोखून ठेवली आहे. तसेच काही सरकारी कार्यालयांनाही पेटवून देण्‍यात आले. प्रशासनाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्‍काळ संचारबंदी लागू केली आहे. पूर्व बिहारमध्‍ये अलर्टही जारी करण्‍यात आला आहे. भोजपूर आणि आरा परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. ब्रह्मेश्‍वर यांच्‍या हत्‍येनंतर बिहारमध्‍ये पुन्‍हा हत्‍यासत्र सुरु होण्‍याची भीतीही व्‍यक्त करण्‍यात येत आहे. पाहा फोटोफीचर....