आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर पिंकी 'अप्रामाणिक', वैद्यकीय तपासणीत अढळली पुरुषांची लक्षणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - बलात्काराचा आरोप असलेली पिंकी प्रामाणिक अखेर 'अप्रामाणिक' असल्याचे सिद्ध झाले आहे. ११ सदस्यीय डॉक्टरांच्या टीमने सादर केलेल्या अहवालानुसार पिंकीमध्ये पुरुषाची लक्षणे आढळली आहेत. २५ दिवसांच्या कारावासानंतर पिंकीला मंगळवारी जामीन मंजूर झाला.
सोमवारी पश्चिम बंगाल विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने एसएसकेएम हॉस्पिटलला पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे की, सर्वसामान्य पुरुषांमध्ये आढळणारे एक्स-वाय कारयोटाईप पिंकीमध्ये देखील सापडले आहेत.
आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या पिंकी प्रामाणिक हिला मंगळवारी नॉर्थ 24 परगणा न्यायालयाने जामीन मंजूर केला. तिच्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

पिंकीला 14 जूनला या प्रकणात अटक करण्यात आली होती. 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये पिंकीने दोहा येथे 2006 मध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

पिंकी ही पुरूष असून तिने तिच्या सहकार्‍यावर बलात्कार केल्याच्या आरोप ठेवण्यात आला आहे. तिची नुकतीच लिंग चाचणी घेण्यात आली. ११ सदस्यीय डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर पिंकीमध्ये पुरुषाची लक्षणे असल्याचा अहवाल डॉक्टरांची टीमने दिला आहे. अहवालानुसार, स्त्रीयांमध्ये दोन एक्स क्रोमोजोम्स असतात तर पुरुषांमध्ये एक एक्स आणि एक वाय असतात.
या अहवालाबद्दल मेडिकल बोर्डच्या एका डॉक्टरांचे म्हणणे आहे की, विज्ञान प्रत्येक गोष्टीचा निष्कर्ष सांगू शकत नाही. पिंकीची केस देखील अशीच आहे. पिंकी कुणावर बलात्कार करु शकते का, याचे उत्तर डॉक्टर देखील स्पष्टपणे देऊ शकत नाही.
सुवर्णपदक विजेत्या पिंकी प्रामाणिकला जामीन
पिंकी प्रामाणिकच्‍या लिंगचाचणीचा व्हिडिओ इंटरनेटवर
IN DEPTH: काय आहे पिंकी नावाच्‍या 'पुरूषा'ची कथा