आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंकीच्या गावात संताप आणि आश्चर्यही..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकात्यापासून सुमारे 300 किमी अंतरावर एशियाड स्पर्धेतील सुवर्णपद विजेती धावपटू पिंकी प्रामाणिकचे गाव. याच गावात पिंकी शिकली. मोठी झाली. पण आज तिचे घर, परिसर, शाळेतील सर्वांनाच धक्का बसला आहे. संताप व्यक्त केला जात आहे. तसेच एवढय़ा वर्षांनंतर एकाएकी पिंकीवर मुलगी असल्याचा पुरावा देण्याची अपमानास्पद वेळ आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
26 वर्षांची पिंकी रेलवेमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक आहे. तेथेही तिला एक महिला म्हणूनच नोकरी मिळाली. तिने एक यशस्वी धावपटू म्हणून नावलौकिक मिळवला आहे. आजपर्यंत ती मुलगी आहे की मुलगा हा प्रश्नच कधी उद्भवला नव्हता. वडील दुर्गाचरण आणि आई पुष्पा न्यायालयातून मुलीची सुटका झाल्यानंतर कोलकात्याला गेले आहेत. घरी लहान बहीण झुमका आणि वहिनी शीतलाचीच भेट झाली. झुमकाने सांगितले, ‘आम्ही पाच बहिणी आणि एक भाऊ लहानपणापासून सोबतच राहिलो, खेळलो, शिकलो. ताईचे वागणे कधीही विचित्र वाटले नाही.आता ताईचा कोणावरही विश्वास राहिला नाही. जिला तिने मदतीचा हात दिला, आपल्यासोबत कोलकात्याला ठेवले तिनेच दगा दिला. तिच्यामुळेच आज आम्हाला हा दिवस पाहावा लागतोय.’
शाळेत असताना पिंकीने ग्रामीण स्पर्धांमध्येही हिरीरीने सहभाग घेतला. स्थानिक स्पर्धेत तिला जर्सी गाय बक्षीस मिळाली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. ती 2002 पासून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली. सध्या पुरुलियापासून तिलकडीहपर्यंत पिंकीची चर्चा आहे; पण कामगिरीमुळे नाही तर वादविवादांमुळे. तिचे शालेय सवंगडी जयदीप आणि गिरीश सांगतात, की आम्हाला तर टीव्हीवर कळले की, पिंकी उभयलिंगी आहे. हे सगळे बकवास आहे.
याआधीही पिंकीविरोधात कारस्थान- पिंकीसोबत शाळेच्या स्पर्धेत खेळलेले धावपटू सिलोट कुइरी सांगतात, की याआधीही 2004 मध्ये तिच्या बॅगमध्ये रिव्हॉल्वर ठेवून तिला फसवण्याचा कट रचला गेला होता. तेव्हा तिच्यावर शस्त्रास्त्र कायद्याचा खटलाही चालला होता. आता बंगालमधील एका मंत्र्याची जमीन लाटल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पिंकीचे शिक्षक शिवचरण महतो इतर गावकर्‍यांप्रमाणे तिच्याच बाजूने आहेत. ते सांगतात, पिंकी फक्त तिलकडीह गावाची नाही तर संपूर्ण पुरूलियाची लेक आहे. तिच्या कामगिरीवर आम्हाला गर्व आहे.
-मी तिला शाळेत प्रवेश दिला होता. आठवीपर्यंत ती इतर मुलींप्रमाणेच येथे शिकली. तिच्यावरील आरोपांमागे काही कारस्थान असू शकते. आम्हाला तर पिंकीचा अभिमान आहे. - श्यामलचंद्र महतो, मुख्याध्यापक, तुनतुडी उच्च् माध्यमिक विद्यालय
IN DEPTH: काय आहे पिंकी नावाच्‍या \'पुरूषा\'ची कथा