आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता येणार चलनात प्लॅस्टिकच्या नोटा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/जयपूर - बनावट नोटांचा उसळलेल्या बाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व बॅकने चलनामध्ये प्लॅस्टिकच्या नोटा आणण्याच्या निर्णय घेतला आहे.
रिझर्व बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर एच.आर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट नोटांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जयपूर, शिमला, भुवनेश्वर या शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग केला जाणार आहे. या प्रयोगांतर्गत दहा रूपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणल्य़ा जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्लॅस्टिकच्या नोटांमुळॆ पर्यावरणावर होणार्‍या परिणामांचा देखील यामध्ये अभ्यास केला जाणार आहे.