आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Dr. Manmohan Singh On Comment In Sammana By Shiv Sena Chief Balasaheb Thackeray

बाळासाहेबांनी म्हटले पंतप्रधानांना राजकीयदृष्‍ट्या 'नपुंसक'; भडकले नेटीझन्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - देशाचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शेलक्या शब्दांत टीका केली आहे. पंतप्रधानांना त्यांनी राजकीयदृष्ट्या 'नपुंसक' म्हटले. बाळासाहेब नेहमी कोणालाही आपल्या 'ठाकरी शैली'चे शिकार करतात. परंतु या वेळी जरा त्यांनी अतीच केले असल्याच्या प्रतिक्रिया ऑनलाईन विश्वात उमटल्या आहेत. मनमोहनसिंग यांच्यावर बाळासाहेबांनी केलीली टीका 'नेटीझन्स'ला बोचली आहे.
मराठी माणसाच्या मुदद्यावरून बाळासाहेब नेहमी जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतात. म्हणून काय ते कोणाला काहीही म्हणतील? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुळातच त्यांनी राष्‍ट्रपती निवडणुकीत राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार पी ए संगमा यांना समर्थन दिले नाही. यूपीएचे उमेदवार आणि कॉंग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा ‍दिल्याचे जाहीर केले होते. तेव्हाही नेटिझन्स बाळासाहेब ठाकरेंवर नाराज झाले होते.
बाळासाहेबांनी केलेल्या टीकेवरून माइक्रो ब्‍लॉगिंग साइट 'ट्विटर'वर नेटीझन्सनी नोंदवलेल्या काही निवडक प्रतिक्रिया...
@chandrabhushanj यांनी बाळासाहेबांना प्रश्न केला आहे. 'यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जींना पाठिंबा का दिला?'
@VlV3K ने लिहिले आहे की, 'बाळासाहेबांनी 'टाइम' नियतकालिकातील 'अंडरअचिव्हर' या शब्दाचा अर्थ मराठमोळ्या माणसांना ट्रान्सलेट करून सांगितला आहे'
श्रेयस शेवाडेने @kickasswriter या अकाऊंटवर लिहिले आहे की, 'बाळासाहेब ठाकरेंनी पंतप्रधानांवर टीका करताना मराठी वाकप्रचाराचा वापर केला आहे.
@TheRadioJoker यांनी तर बाळासाहेबांनाच टिमटा काढला आहे. 'बाळासाहेबांचे काय, भविष्‍यात ते 'पॉलिटिकल व्हायग्रा' असाही 'अंडर अचिव्हर'चा अर्थ सांगतील.'
@KnightKits ने सांगितले की, 'माझ्या मते बाळासाहेब ठाकरे 'एडॉल्‍फ हिटलर'च्या अवशेषांपासून बनले आहेत'
‏@PM0India वर म्हटले आहे की, 'बाळासाहेब ठाकरेंनी मला राजकीयदृष्‍टा नपुंसक म्हटले आहे. राष्‍ट्रपती निवडणूक होऊ द्या, मग दाखवतो बेट्याला.'
दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधील अग्रलेखात मनमोहन सिंग यांना राजकीयदृष्ट्‍या 'नपुंसक' म्हटले होते. अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘टाइम’ मॅगझिनच्या आशिया आवृत्तीच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे छायाचित्र ‘अंडरअचिव्हर’ म्हणून प्रसिद्ध करण्यात आले होते. अंडर अचिव्हर' म्हणजे तरी काय? असा प्रश्न पडणार्‍या मराठमोळ्या वाचकांची समस्या बाळासाहेबांनी आपल्या खास 'ठाकरी' शैलीत सोडविली आहे. 'देशाचे पंतप्रधान हे राजकीयदृष्ट्या नपुंसक आहेत व म्हातारा नवरा गमतीला अशा त्यांची अवस्था झाली आहे', अशा शब्दात बाळासाहेबांनी मनमोहन सिंग यांची खिल्ली उडवली होती.
मनमोहनसिंग जागतिक पातळीवरील हास्यास्पद प्राणी- बाळासाहेब ठाकरे