आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेत रंगला 'मुशायरा', पंतप्रधानांच्‍या शायरीला भाजपनेही दिले 'सुरात' उत्तर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- लोकसभेत बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्‍या अनोख्‍या रूपाने विरोधीपक्षासह सर्वांनाच आश्‍चर्यचकित केले. बुधवारी मनमोहन सिंग यांच्‍यासह प्रमुख विरोधी पक्षही शेरोशायरीच्‍या मूडमध्‍ये दिसून आला. मनमोहन सिंग यांनी विरोधी पक्ष भाजपवर शेरोशायरीच्‍या रूपात कठोर शब्‍दात टीका केली. तर विरोधी पक्षनेत्‍या सुषमा स्‍वराज यांनीही त्‍यांच्‍यावरील टीकेचा त्‍याच शब्‍दात पलटवार केला. मनमोहन सिंग यांनी मिर्झा गालिब यांच्‍या शेरचा हवाला देत म्‍हटले, 'हमको उनसे वफा की है उम्‍मीद जो नही जानते वफा क्‍या है' यावर सुषमा स्‍वराज मनमोहन सिंग यांना उद्देशून म्‍हणाल्‍या, 'कुछ तो मजबुरियां रही होगी, यूं ही कोई बेवफा नही होता.'

मनमोहन सिंग भाजपवर टीका करताना म्‍हणाले, देशातील मतदारांनी या पक्षाला मागील दोन निवडणुकांमध्‍ये चांगलेच तोंडावर पाडले आहे. येत्‍या निवडणुकीतही या पक्षाचे हेच हाल होणार आहेत.

मनमोहन सिंग यांनी लोकसभेतील राष्‍ट्रपतींच्‍या अभिभाषणाच्‍या धन्‍यवाद प्रस्‍तावावर चाललेल्‍या चर्चेवर उत्तर देताना भाजपवर शेरो शायरी आणि म्‍हणींचा पुरेपूर वापर करत खरपूर शब्‍दात समाचार घेतला.