आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात 1998 मध्ये घेतलेल्या पोखरण अणुचाचणीबाबत खळबळजनक दावा केला आहे.
कलाम यांनी गुरूवारी सातव्या आर. एन. काव. मेमोरियल व्याख्यानमालेतील आयोजित कार्यक्रमादरम्यान वरील खुलासा केला आहे. कलाम म्हणाले, पोखरण अणुचाचणी 1996 मध्येच केली जाणार होती. मात्र, काही राजकीय अडचणींमुळे ती चाचणी पुढे ढकलली होती. 1996 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाच्या दोन दिवस आधी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि त्यांच्या टीमने अणुचाचणी करण्याची तयारी पूर्ण केली होती. कलाम त्यावेळी तत्कालीन संरक्षणमंत्री यांचे वैज्ञानिक सल्लागार होते.
आजही आठवतो तो क्षण- माजी राष्ट्रपती कलाम म्हणाले, 1996 मधील ते दृश्य व क्षण आजही मला आठवतो ज्यावेळी मला एक फोन आला होता व तत्कालीन पीएम राव यांनी मला तत्काळ बोलवून घेतले होते. मी लागलीच राव यांच्याकडे पोहचलो. त्यावेळी राव यांनी सांगितले की, कलाम आणि त्यांच्या टीमने दोन दिवसात अणुचाचणी करण्यासाठी तयार राहावे. मी आता तिरूपतीला जात आहे. आपली टीम चाचणीसाठी तयार असायला पाहिजे.
मात्र, दोन दिवसांनी जेव्हा लोकसभेचा निकाल आला आणि परिस्थिती बदलत गेली. राव यांचे सरकार सत्तेवर आले नाही व सत्तेची सूत्रे अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे गेली. त्यानंतर राव यांचा मला फोन आला व त्यांनी मला परिस्थिती सांगितली. तसेच पुढील अणुचाचणीबाबत वाजपेयी यांना माहिती देण्यास सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.