आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अफजल गुरुची फाशी : पंतप्रधानांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना विचारला जाब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अफजल गुरुची फाशी सरकारसाठी अवघड दुखणे होऊन बसली आहे. अफजलच्या गुपचूप फाशीवरुन मानवाधिकार कार्यकर्ते सरकारवर प्रश्नांचा भडीमार करत आहेत. अफजलच्या कुटुंबियांना त्याच्या फाशीची सुचना उशिरा मिळाल्याबद्दल पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीही गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेना जाब विचारला आहे. पंतप्रधान म्हणाले, अफजलला फाशी देण्यापूर्वी त्याच्या कुटुंबियांना माहिती का दिली गेली नाही ? राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपाल परिषदेनंतर पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांशी बोलताना ही नाराजी व्यक्त केली.

पंतप्रधान म्हणाले, अफजल जरी दहशतवाद्यांच्या संपर्कात असला तरी, त्याच्या कुटुंबियांना सुचना देणे गरजेचे होते. त्यासाठी राज्याच्या हेलिकॉप्टरचाही उपयोग केला जाऊ शकत होता. पंतप्रधानांनी स्पीड पोस्टने पत्र पाठवण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याआधी जुम्मू आणि काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दूल्ला आणि त्यांचे वडील व केंद्रीय मंत्री फारुख अब्दूल्ला यांनी देखील अफजलला गुपचूप फाशी देण्यावर आणि त्याच्या कुटुंबियांना सुचना न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावर गृहमंत्र्यांनी नियमानुसार अफजलच्या कुटुंबियांना फाशीची माहिती दिली असल्याचा खुलासा केला होता. ते म्हणाले, हे काम तिहार तुरुंग प्रशासनाने केले होते. अफजलच्या फाशीचा मानवाधिकार कार्यकर्ते आणि काश्मिरमधील विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे.

(पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे संग्रहित छायाचित्र.)