आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पीएसयूं’ना अधिक स्वातंत्र्य हवे : मोईली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (पीएसयू) अधिक स्वातंत्र्य देण्याची बाजू मांडताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली म्हणाले की, पीएसयूकडून चांगले निकाल हवे असतील तर त्यांना कामकाजात अधिक स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. वास्तविक पाहता पीएसयू हे बदलाचे प्रणेते असून, अर्थव्यवस्थेला ते एका नव्या टप्प्यावर पोहोचवतील. दैनिक भास्कर समूहाच्या वतीने सोमवारी नवी दिल्लीत झालेल्या इंडिया प्राइड अवॉर्ड 2012-13 सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी इंडियन ऑ इल कॉर्पोरेशनचे सीएमडी आर.एस. बुटोला यांना लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्डने गौरविण्यात आले. दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल म्हणाले की, आजदेखील पीएसयूशिवाय अर्थव्यवस्थेची कल्पनाही करता येत नाही.

वीरप्पा मोईली म्हणाले, सरकारला नेहमीच पीएसयूविषयी अभिमान वाटत आला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पीएसयूसाठी ज्या कमांडिंग हाइट्सची कल्पना केली होती, ती आजदेखील कालोचित आहे. एवढेच नाही तर पीएसयूचे नेतृत्व करणारे आपापल्या क्षेत्रात उंचीवर आहेत. पुढे ते म्हणाले की, देशातील पीएसयूंना वाटले आणि त्यांना काम करण्याची पूर्ण मोकळीक मिळाली तर पेट्रोलियमच्या क्षेत्रात भारत ब-या पैकी स्वावलंबी होऊ शकतो. सध्या आमचे कच्च्या तेलाच्या आयातीचे बिल सात लाख कोटी रुपये असल्याचे सांगून पीएसयूच्या प्रयत्नांतून 2020 या वर्षापर्यंत ते 50 टक्क्यांनी कमी होऊ शकते, अशी आशा मोइली यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांनी पीएसयूंची भूमिका अधोरेखित करताना म्हटले की, पीएसयूची भागीदारी प्रत्येकच क्षेत्रात आहे आणि त्यांच्या चांगल्या कामांना आम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे.


ते म्हणाले की, पीएसयूंच्या कामकाजात सूसूत्रता आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती मी सरकारला करेन. जेणेकरून खासगी क्षेत्राशी या पीएसयू स्पर्धा करू शकतील.‘लाईफटाइम अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित इंडियन

ऑईल कार्पोरेशनचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक आर. एस. बुटोला म्हणाले, हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही. यात सर्व सहका-या ंचा तेवढाच वाटा आहे. काम करत राहा. एक दिवस आपल्याला नक्की सन्मान प्राप्त होईल. आपले कामच नावलौकिक मिळवून देईल, असेही ते म्हणाले.

‘आम्ही ज्या परिस्थितीत काम करतो ती पाहता आम्ही केलेली कामगिरी क्षमतेचेच प्रतीक आहे. इंडियन ऑ ईल कार्पोरेशनशिवाय दैनंदिन जीवन ही कल्पनाच कोणी करू शकत नाही’, असेही बुटोला म्हणाले.
या समारंभाला दैनिक भास्कर समूहाचे संचालक गिरीश अग्रवाल, कार्यकारी संचालक भरत अग्रवाल, समूहाचे चीफ कार्पोरेट सेल्स अँड मार्केटिंग ऑफिसर प्रदीप द्विवेदी, ‘व्हिटल सी’चे सीईओ ज्योतिनारायण आणि सुकेमचे एमडी तसेच सीईओ कुंवर सचदेव उपस्थित होते.