आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Poachers Killed Tiger In Madhya Pradesh By Giving Current

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भोपाळजवळ वाघाची विजेचा शॉक देऊन शिकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने हाय अलर्ट जारी केल्यानंतरही भोपाळजवळ वाघाची शिकार झाल्याचे उघड झाले आहे. भोपाळ वन विभागाच्या कठोतिया गावातील टेकडीवर मंगळवारी पाच वर्षांच्या नर वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. वाघांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पथकाचे सदस्य तेंदूपत्ता तोडणी आणि लग्नकार्यांत गुंतलेले असताना इकडे मात्र वाघाची शिकार झाली आहे. या प्रकरणी वन विभागाने 8 जणांना ताब्यात घेतले आहे.
विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार करण्यात आल्याचे वनाधिका-यांचे म्हणणे आहे. त्याचा मृतदेह लपवण्यासाठी शिका-यांनी वाघाचे दोन तुकडे करून ते गुहेत लपवून ठेवले होते. हा वाघ आॅक्टोबर 2010पासून कलियासोत-केरवा क्षेत्रात सक्रीय होता.

आधीही दोनवेळेस झाल प्रयत्न
वाघाच्या शिकारीचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला होता. कलियासोतमध्ये फास लावताना वनविभागाने सात जणांना अटक केली होती. मात्र त्यांनी वाघ नव्हे तर जंगली डुकराची शिकार केल्याचे कबूल केले होते. यानंतर विषारी किटनाशकांद्वारे वाघाच्या शिकारीचा प्रयत्न झाला होता. जंगलात किटनाशकाचे अनेक डबे आढळून आले होते. वनविभागाने ताब्यात घेतलेल्या आठजणांपैकी तिघे मुख्य आरोपी असून, इतरांपैकी तिघांनी
शिकारीनंतर वाघ टेकडीवर चढवण्यास मदत केली होती तर इतर दोघांना या शिकारप्रकरणाची पूर्ण माहिती होती.
पाण्यात विष टाकून वन्य प्राण्यांची शिकार
वाघांवर भारी... सुपारी!