आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कात टाकली: पारंपरिक पोचमपल्ली साड्यांना नवा साज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: दक्षिण भारतीय इकट कलेचा आविष्कार असलेल्या पोचमपल्ली (आंध्र प्रदेश) येथील पारंपरिक सिल्क साड्यांना आधुनिकतेचा साज चढवण्यात आला आहे. डिझायनर राहुल मिश्रा यांनी या पारंपरिक संस्कृतीला मॉडर्न लूक दिला आहे. त्यामुळे मॉडर्न महिलांनाही ही साडी आता आकर्षित करणार आहे.
भारतीय टेक्स्टाइल्समधील मोठे नाव म्हणून राहुल मिश्रा हे परिचित आहेत. या साड्यांच्या निर्मितीची पद्धत त्यांनी आपल्या नवीन कलेक्शनसाठी काहीशी बदलली आहे. धाग्यांना अगोदर रंगवणे त्यानंतर त्याचे विणकाम करण्यात आले आहे. साड्या, दुपट्टे, जॅकेट्स, स्कर्ट या कलेक्शनसाठी त्यांनी हीच पद्धत अवलंबिली आहे. ताज खजाना या लक्झरी स्टोरच्या सहकार्याने याचे लाँचिंग करण्यात येणार आहे. विणण्याच्या पारंपरिक पद्धतीला पुनरुज्जीवन देण्याचे काम या माध्यमातून करण्यात येत आहे. याचा वापर पुन्हा एकदा आधुनिक भारतात केला जाणार आहे.
वस्त्र विणण्याची ही एक जुनी कला आधुनिक काळात जिवंत राहावी यासाठी हा प्रयत्न करण्यात येत आहे. या कलेतून तयार केले जाणारे कपडे नवीन पिढीतील महिलांनाही परिधान करता यावेत, म्हणून हे कलेक्शन असल्याचे राहुल यांनी सांगितले. वाराणसीमध्ये या पद्धतीत काही प्रमाणात बदल केले आहेत. आता आम्ही देशभरात या हस्तकलेच्या इतिहासाला जाणून घेणार आहोत. या माध्यमातून बेरोजगारी, शिक्षण यासारखे प्रश्नदेखील सुटतील, असे ताज खजानाच्या प्रमुख सरिता हेगडे यांनी सांगितले.
हैदराबाद शहरापासून 70 कि.मी.च्या परिसरात पोचमपल्लीसह एकूण 40 गावांमध्ये या साड्यांचे उत्पादन केले जाते.यामध्ये ‘उत्सव’ साडी हा प्रकार सर्वोत्तम समजला जातो.या इकट हा मलाय-इंडोनेशियन शब्द मागींकटपासून तयार झाला आहे.