आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी केंद्र सरकारने यंदाचे पद्म पुरस्कार जाहीर केले. यात 108 जणांचा सन्मान करण्यात आला असून महाराष्ट्रा तून कविवर्य मंगेश पाडगावकर, राजेश खन्ना (कला), अदी गोदरेज (उद्योग) यांना पद्मभूषण तर नाना पाटेकर, श्रीदेवी (कला), राहुल द्रविड, डिंकोसिंग (क्रीडा) आदी मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय जसपाल भट्टी, शर्मिला टागोर (पद्मभूषण), निदा फाजली (पद्मश्री) यांचाही सन्मान करण्यात आला आहे.
महाराष्ट्रा तून सामाजिक क्षेत्रात धुळे येथील शिवाजीराव गिरधर पाटील तर कला क्षेत्रात डॉ. कनक रेळे यांना आणि वैद्यकीय क्षेत्रात डॉ. नंदकिशोर लौड यांना पद्मभूषण जाहीर झाला आहे. कला क्षेत्रात जयमाला शिलेदार, सुरेश तळवलकर, अपूर्वा वीर, सुधा मल्होत्रा, निर्माते रमेश सिप्पी, नीलिमा मिश्रा यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. विज्ञान-तंत्रज्ञानात दीपक पाठक, प्रो. मुस्तनसिर बरमा, प्रो. शरद काळे आणि उद्योग क्षेत्रात मिलिंद कांबळे, डॉ. राजेंद्र बडवे, वैद्यकीय क्षेत्रात सुंदरम नटराजन व डॉ. अमित मायदेव यांना पद्मश्री सन्मान जाहीर झाला.
चौघांना पद्मविभूषण : रघुनाथ मोहपात्रा, एस. हैदर रझा (कला), प्रोफे. यश पाल, प्रो. रोड्डम नरसिंहा (विज्ञान-अभियांत्रिकी) यांना पद्मविभूषण हा नागरी सन्मान बहाल करण्यात आला आहे. परंपरेनुसार मार्च-एप्रिलमध्ये राष्ट्र पतींच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल.
इतर काही मान्यवर असे : पद्मभूषण : डॉ. ए. एस. पिल्लई, डॉ. विजयकुमार सारस्वत, अमेरिकेतील प्रोफे. सत्य एन. अथलुरी, प्रोफे. जोगेशचंद्र पाटी, राममूर्ती त्यागराजन.
पद्मश्री : गुलाम मोहम्मद साझनवाज, बलवंत ठाकूर, राजेंद्र टिक्कू, शाकिर अली (कला), रिमा नानावटी, रामकिशन, अविनाश चंदर (सामाजिक क्षेत्र), योगेश्वर दत्त, प्रेमलता अग्रवाल, नायब सुभेदार बजरंगलाल (क्रीडा), रितू कुमार (फॅशन डिझायनिंग), डॉ. रवींद्रसिंग बिश्त (पुरातत्त्व विभाग).
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.