आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Arrested For Demanding Arun Jately's Phone Call Details

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरुण जेटलींचे कॉल डिटेल्स मागणारा पोलिस अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्या फोन कॉलची माहिती अनधिकृतरीत्या काढण्याचा प्रयत्न करणा-या एका कॉन्स्टेबलला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. कोणाच्या सांगण्यावरून ही माहिती मागवण्यात आली, याचे स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी केली आहे.


भाजपने केले 1100 फोन टॅप- हिमाचल प्रदेशात भाजपचे सरकार असताना 2008 ते 2012 या काळात उच्चपदस्थ अधिकारी व नेत्यांचे तब्बल 1100 फोन क्रमांक टॅप करण्यात आले असल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.


या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या स्टेट फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या एका पथकाने राज्याच्या मुख्य सचिवांना एक अहवाल सादर केला आहे. त्यात एकूण 1100 क्रमांक टॅप करण्यात आले. यापैकी किती क्रमांक पूर्वपरवानगी घेऊन टॅप करण्यात आले व किती अवैध मार्गाने टॅप झाले याची माहिती लवकरच जाहीर होणार आहे. विद्यमान मुख्यमंत्री वीरभद्रसिंह हे जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांनी तत्कालिन धुमल सरकारवर अनेकदा अवैधरीत्या फोन टॅपिंगचा आरोप केला होता.