आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठलाग करून पोलिसांनी शिक्षकांना झोडपले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारचे कंत्राटी शिक्षक आणि पोलिसांमध्ये मंगळवारी जोरदार धुमश्चक्री उडाली. विविध मागण्यांसाठी आंदोलन करणा-या शिक्षकांनी दगडफेक करताच पोलिसांनी अक्षरश: पाठलाग करून झोडपले. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या.

विधानभवनाला घेराव घालण्यासाठी कूच
नोकरीत कायम करा आणि वेतन समानता आदी विविध मागण्यांसाठी कंत्राटी शिक्षक विधानभवनाबाहेर निदर्शने करीत होते.केवळ 500 मीटर अंतरावर ही निदर्शने सुरुअसताना शिक्षक विधानभवनाला घेराव घालण्यासाठी पुढे निघाले. हे पाहताच पोलिस बिथरले.
100 शिक्षक व पोलिस या धुमश्चक्रीत जखमी झाले. तीन जीप आणि एक सिटी बस पेटवून देण्यात आली. विधानसभा सभागृहातही लाठीमाराचे पडसाद उमटले. विरोधकांनी राजद, काँग्रेस आणि भाकपने सरकारचा निषेध करुन सभागृह दणाणून सोडले. परिणामी तासभर कामकाज तहकूब करावे लागले.

शिक्षकांची दगडफेक, पोलिसांचा लाठीमार
पोलिसांनी लाठीमारास सुरुवात केली. हे पाहून शिक्षकांनीही दगडफेक करताच धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. विशेष म्हणजे रस्त्यावरील गाड्यांची शिक्षकांबरोबरच पोलिसांनीही तोडफोड केली.