आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Investigation In Fiza Murder Case Under Scanner

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिजा मृत्‍यूप्रकरणः तपासात पोलिसांच्‍या दिरंगाईवर संशय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिजा मोहम्‍मद उर्फ अनुराधा बाली हिच्‍या मृत्‍यूचे रहस्‍य वाढतच आहे. याप्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्‍पद असून अनेक बाबतीत पोलिसांकडून दिरंगाई झाल्‍याची टीका करण्‍यात येत आहे. फिजाच्‍या घरातून जप्‍त करण्‍यात आलेल्‍या वस्‍तुंची फॉरेन्सिक तपासणी करण्‍यात येणार आहे. परंतु, हे नमुने अद्याप प्रयोगशाळेत पोहोचलेले नाहीत. नमुने घेऊन पोलिस पोहोचले त्‍यावेळी प्रयोगशाळा बंद झाली होती. आता आज सर्व नमुने जमा करण्‍यात येतील.
पोलिसांनी दारु, काचेचे ग्‍लास, सिगारेट तसेच इतर काही वस्‍तु फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्‍त केले आहे. फिजावर विषप्रयोग करण्‍यात आला होता का, किंवा इतर कोणता पदार्थ तिला खाण्‍यातून अथवा पेयातून देण्‍यात आला होता का, इत्‍यादींची माहिती या तपासणीतून मिळेल. परंतु, पोलिसांनी दिरंगाई केल्‍यामुळे संशय निर्माण झाला आहे. सर्व नमुने वेळेत प्रयोगशाळेमध्‍ये पोहोचणे आवश्‍यक आहे. ते झाले नाही. त्‍यामुळे नमुन्‍यांसोबत छेडछाड करण्‍याचाही संशय व्‍यक्त करण्‍यात येत आहे.
शवविच्‍छेदनानंतर फिजाचा मृतदेह कुटुंबियांना देण्‍यात आला. मंगळवारी तिच्‍या काकांनी अंत्‍यसंस्‍कार केले. हिंदू पद्धतीने सर्व सोपस्‍कार पार पडले. फिजा उर्फ अनुराधा हिने इस्‍लाम धर्म स्विकारून हरियाणाचे माजी उपमुख्‍यमंत्री चंद्रमोहन यांच्‍याशी 2008 मध्‍ये विवाह केला होता. चंद्रमोहन यांनीही धर्मपरिवर्तन करुन इस्‍लाम स्विकारला होता. त्‍यांचीही चौकशी होण्‍याची शक्‍यता आहे.
PHOTOS : फिजा उर्फ अनुराधा बाली हिचा गुढ मृत्‍यू
VIDEO : खुलेआम 'मजा' करायचा चांद, तर फिजा लाजायची...
फिजाचा मृत्‍यू की हत्‍या? सिगारेट, शॉपिंग बिलाने वाढले रहस्‍य