आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई स्फोट खटल्यातून नाव वगळण्यासाठी अबू सालेम टाडा न्यायालयात!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ मुंबई: पोर्तुगालच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पणाबाबत निर्णय कायम ठेवल्यानंतर कु्ख्यात गुंड अबू सालेमने आता मुंबईतील विशेष टाडा न्यायालयात धाव घेतली आहे. मार्च 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या खटलातील सालेमचे नाव वगळण्यात यावे, अशी मागणी त्याचे वकील रशिद अन्सारी यांनी मंगळवारी न्यायालयात केली आहे.
कुख्यात गुंड अबू सालेमच्या प्रत्यार्पण करारात नियमांचा भारत सरकारकडून भंग झाल्याचा निर्णय पोर्तुगालमधील सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवला. त्यामुळे सालेमची रवानगी पुन्हा पोर्तुगालला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन अबूला पोर्तुगालमध्ये अटक झाल्यानंतर नोव्हेंबर 2005 मध्ये भारताच्या हवाली करण्‍यात आले होते. पोर्तुगालच्या एका न्यायालयाने या प्रकरणी भारताने प्रत्यार्पण कराराचा भंग केल्याचा निर्णय दिला होता. या निर्णयावर केंद्रीय अन्वेशण विभागाने (सीबीआय) पोर्तुगाल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर मंगळवारी सुनावणी झाली. सालेमच्या प्रत्यार्पण कराराबाबतच्या अटींचे पालन भारताने केले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जर अबू सालेमचे प्रत्यार्पणच रद्द ठरविले आहे तर मुंबई स्फोटाच्या खटल्यातून अबू सालेमचे नाव वगळून टाकवे, असे सालेमच्या वकीलांनी विशेष न्यायालयात सांगितले.
या निर्णयावरही सीबीआय तिथल्या घटनापीठात दाद मागणार आहे, असे सीबीआयच्या सुत्रांनी सांगितले. सालेमवर चित्रपट निर्माता गुलशन कुमारच्या हत्येसह अनेक गुन्हे आहेत. त्यामुळे त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते.
बनावट चकमक करून ते मला ठार मारतील-अबू सालेम