आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रावर इलेक्ट्रॉनिक पॉवर हाऊस शक्य - डॉ. राजमल जैन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अशोकनगर - भविष्यात चंद्रावर इलेक्ट्रॉनिक हाऊस तयार केले जाऊ शकते. जर ही संकल्पना प्रत्यक्षात आली तर भारत जगातील महाशक्ती म्हणून पुढे येईल. चंद्रावर इलेक्ट्रॉनिक हाऊस बनवल्याने जगातील विजेची समस्या संपुष्टात येईल, असा आशावाद डॉ. राजमल जैन यांनी व्यक्त केला.

येथे आयोजित दोनदिवसीय करिअर कौन्सिलिंग सेमिनारसाठी ते आले होते. त्यांनी सांगितले की, चंद्रावर हेलियम 3 मिळण्याची शक्यता कायम आहे. जर हेलियम मिळाले तर केवळ एक किलो हेलियममधून संपूर्ण जग उजळून निघेल. चांद्रयान 2 मिशनबाबत त्यांनी सांगितले की, आम्ही चंद्राभोवती फेरी मारून बाहेरच्या वायुमंडळाबाबतची माहिती प्राप्त केली होती. मिशन 2 मध्ये शिडी लावून रोबोटला चंद्रावर उतरवले जाईल. त्याला तेथूनच नियंत्रित केले जाईल. रोबोटद्वारे माती व मिनरल घटकांचीही तपासणी होईल. चांद्रयान 2 प्रकल्प 2016 मध्ये अमलात येईल, असे त्यांनी सांगितले.