आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poster At Bjp Office Warns Of Muslims Wooing Hindu Girls, Removed

भाजप कार्यालयाच्या बाहेरील 'लव्ह जिहाद'च्या पोस्टरवरून दिल्लीत गोंधळ !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या पोस्टरने नवीन वादाला जन्म दिला आहे. या पोस्टरमध्ये 'लव्ह जिहाद'च्या विरोधात लोकांना सतर्क करण्यात आले आहे. 'लव्ह जिहाद' हे काही ठराविक मुस्लीम युवकांनी सुरु केलेले मिशन आहे. ज्यामध्ये हे युवक गैरमुस्लीम मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे इस्लाम धर्मात परिवर्तन करतात.
भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या पोस्टरमधून हिंदू लोकांकडे मागणी केली आहे की, अशा काही घटना तुमच्या जवळपास घडत असतील तर त्याची माहिती आम्हाला द्या. पोस्टरमध्ये बॉलीवुड स्टार आमीर खान आणि सैफ अली खान यांचे उदाहरण देण्यात आले आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर काढून टाकले आहे, अशी माहिती मिळाली आहे.
हे पोस्टर भगत सिंग क्रांति सेनेने लावले होते. काही महिन्यांपूर्वी भगत सिंग क्रांति सेनेच्या कार्यकर्त्यांनी टीम अण्णाचे सदस्य प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला केला होता. पोस्टरवर ईमेल आयडी आणि फोन नंबर देण्यात आले आहेत, आणि अशा घटना कळवण्याची मागणी केली आहे.
नरेंद्र मोदी-संजय जोशी पोस्टरयुद्ध मुंबईतही