आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Power Cut Shames India In International Community

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगभर भारताची नाचक्की, पंजाब करणार पुन्हा 'ब्लॅक आऊट' ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सलग दोन दिवस वीज गायब झाल्यामुळे जगभर भारताची नाचक्की झाली. मात्र, भारत सरकारचे मंत्री हारतुरे घेण्यात मग्न आहेत. जून्या ऊर्जा मंत्र्यांनी आज नवे गृहमंत्री म्हणून पदभार स्विकारला तर, नवे ऊर्जा मंत्री वीरप्पा मोईले म्हणाले, मला आव्हान स्विकारायला आवडते.
ग्रीड बंद पडण्याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, काही राज्य क्षमतेपेक्षा अधिक वीज घेत असल्यामुळे ग्रीडमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात आले होते. असे असतानाही पंजाब अजूनही निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त वीज घेत आहे. बुधवारी दुपारपर्यंत पंजाबने निश्चित क्षमतेपेक्षा ५०० मेगावॉट अधिक वीज घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रीडमध्ये बिघाड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माजी ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे सोमवारी म्हणाले होते की, 'जी राज्य निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक वीज घेत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.' बुधवारी मोईलींनी ऊर्जा खात्याचा पदभार स्विकारल्यानंतर म्हटले, 'मला आव्हान स्विकारायला आवडतात. वीज आणि इंधन संवेदनशील मुद्दे आहेत. यासंबधीचे प्रश्न कधीही उपस्थित होऊ शकतात. महत्त्वाची गोष्ट ही आहे की, आपण त्यांचा समाना कसा करणार आहोत. वीज निर्मीतीमध्ये आज आम्ही पुरेसे यशस्वि झालो आहोत. आम्हाला आमची क्षमता आणखी वाढवायची आहे. मात्र हेच सर्व काही नाही. आम्हाला आणखीही काम करायचे आहे.'
टीम अण्णाचा आरोप, ९ राज्यात 'ब्लॅक आऊट' सरकारचे कारस्थान
वीज कर्मचारी करणार क्रांतिदिनी आंदोलन