आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साध्वी प्रज्ञा ठाकुरशी आमचा काहीही संबंध नाही- भाजपने झाडले अंग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- 'आरएसएस'मध्ये दहशतवादाला खतपाणी घातले जाते या गृहमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावरून विरेध करणा-या भारतीय जनता पक्षाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रज्ञा ठाकुरशी आमचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. पक्षाचे प्रवक्ते बलवीर पुंज यांनी याबाबत म्हटले आहे की, पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह प्रज्ञा ठाकुर यांना कधीही भेटले नाहीत. उमा भारती प्रज्ञा ठाकुरला भेटल्या असतील पण त्यावेळी त्या पक्षाच्या पदाधिकारी नव्हत्या. प्रज्ञाचा भाजपशी काहीही संबंध नाही. प्रज्ञाचे आरएसएसशी संबंध आहेत की नाहीत यावर मात्र पुंज यांनी उत्तर दिले नाही. प्रज्ञा ठाकुर ही आरएसएसशी संबंधित आखिल भारतीय विद्यार्थी परिषदशी जोडलेली होती. तसेच ती सध्या कॅन्सरग्रस्त असून, भोपाळमधील सेंट्रल जेलमध्ये बंद आहे.

शिंदे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगत पुंज म्हणाले, समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आरीफ कासमानीला वाचविण्यासाठी सरकारने माध्यमांतील बातम्यांचा आधार घेतला आहे. त्याचा पुरावा म्हणून पुंज यांनी एका इंग्रजी साप्ताहिकाचे बातमीचे कात्रण वाटले. ते म्हणाले, केवळ याच बातमीच्या आधारे भारत सरकारने समझौता एक्‍सप्रेस ब्‍लॉस्टप्रकरणातील मुख्य आरोप आरीफ कासमानीला भारतात आणण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. तो मुंबईत झालेल्या ट्रेन ब्लास्टमध्येही मुख्य आरोपी आहे.

हे सर्व माहित असताना गेली तीन वर्षे हा मुद्दा का उचलला नाही यावर पुंज म्हणाले, आम्ही केंद्र सरकारवर विश्वास ठेवला होता. मात्र, शिंदे यांच्या वक्तव्यानंतर आता आम्हाला सरकारचा विश्वास राहिला नाही. शिंदे हे यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द वापरून संपूर्ण हिंदू समाजाला बदनाम केले आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांसारखेच शिंदे यांचे वक्तव्य आहे. शिंदे यांचा निषेध करावा तेवढा थोडाच असून त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवावा, अशी मागणीही पुंज यांनी केली.