Home »National »Delhi» Press Counselor President Markandey Kataju Comment On Mamata Banrjee

ममता बॅनर्जींचे सध्याचे वर्तन अनपेक्षित- काटजू

वृत्तसंस्था | Apr 19, 2012, 18:50 PM IST

  • ममता बॅनर्जींचे सध्याचे वर्तन अनपेक्षित- काटजू

नवी दिल्ली: ममता बॅनर्जी आता बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी प्रशासकाची भूमिका समजून घ्यावी. त्यांचे सध्याचे वर्तन अनपेक्षित आहे, असे मत प्रेस काउन्सिलचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी व्यक्त केले आहे. ममता बॅनर्जी यांच्या व्यंगचित्रावरून सध्या सुरू असलेल्या वादाबाबत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
व्यंगचित्राबाबत ममताची भूमिका चुकीची आहे. आता त्या विरोधी पक्षनेत्या नाही. लोकशाहीची कार्यप्रणाली समजून घेऊन त्यांनी प्रगल्भ व्हावे, असेही काटजू यांनी यावेळी सांगितले.
काटजू म्हणाले, एखाद्याने व्यंगचित्र काढून ते प्रसिद्ध केले म्हणजे गुन्हा नाही. ती कला आहे. यापूर्वी माझेही व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आहे.
तृणमूलचे खासदार सुमन यांनी उडविली ममता बॅनर्जींची थट्टा!

Next Article

Recommended