आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Media Officer Harish Khare Resign Today

पंतप्रधान यांचे मीडिया सल्लागार हरीश खरे यांचा राजीनामा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार हरीश खरे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्या मागील कारण मा‍त्र समजू शकले नाही. हरिश खरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी पंकज पचौरी यांना नियुक्त करण्यात आले आहे.
खरे यांची जून 2009 मध्ये पंतप्रधानांचे मीडिया सल्लागार पदी निवड झाली होती. खरे यांनी मनमोहन सिंग यांच्याकडे आपला राजीनामा पाठवून दिला आहे. पंतप्रधानांनी आपल्याला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिल्यामुळे त्यानी आभारही मानले आहेत. मला पत्रकार होण्याचा आनंद पुन्हा अनुभवायचा आहे, असे खरे यांनी सांगितले.
पंतप्रधानांचे मीडिया सल्लागार होण्यापूर्वी खरे हे 'द हिंदू' च्या नवी दिल्ली स्थित कार्यालयात वरिष्ठ सहसंपादक आणि ब्यूरो प्रमुख होते. त्यापूर्वी ते अहमदाबाद येथे टाइम्स ऑफ इंडियात निवासी संपादक होते.