आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister\'s Honesty Nothing Help For Nation

\'पंतप्रधानांचा प्रामाणिकपणा काही कामाचा नाही\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- पंतप्रधान मनमोहन सिंगांचा प्रामाणिकपणा आणि त्‍यांची बौद्धिक छबी काही कामाची नाही. युपीए सरकार स्‍वातंत्र्यानंतरचे सर्वात भ्रष्‍ट सरकार असल्‍याची टीका मार्क्‍सवादी कम्‍युनिस्‍ट पक्षाचे पॉलिट ब्‍युरो सदस्‍य सीताराम येचुरी यांनी केली आहे. कोलकाता येथे एका रॅलीत ते बोलत होते.

ते म्‍हणाले, 'स्‍वातंत्र्यानंतरचे हे सर्वात मोठे भ्रष्‍ट शासन आहे. अशावेळी प्रामाणिक आणि बौद्धिक छबी कोणत्‍याही कामाची नाही. आमच्‍या पंतप्रधानांना अमेरिका हे देवाप्रमाणे आहे. फक्‍त डोळे बंद करून त्‍यांच्‍या नीतीचे अनुकरण करण्‍यात ते धन्‍यता मानतात. या नव्‍या उदारमतवादी धोरणामुळे दोन भारत बनले आहेत. एक गरीब भारत आणि दुसरा श्रीमंत भारत.'

युपीए सरकारच्‍या भ्रष्‍टाचाराच्‍या मुद्यावर बोलताना येचुरी म्‍हणाले, 'जर सरकार टू जी आणि कोळसा घोटाळा रोखण्‍यास सक्षम ठरली असती तर महागाईवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी पैशाची कमतरता भासली नसती. जेव्‍हा आम्‍ही भ्रष्‍टाचाराच्‍या मुद्यावर बोलतो, तेव्‍हा कॉंग्रेस म्‍हणते पंतप्रधान प्रामाणिक आहेत. आम्‍ही कधीही व्‍यक्तिगत निष्‍ठेवर प्रश्‍न उठवले नाहीत. पण असा प्रामाणिकपणा काय कामाचा जो आमच्‍या देशातील लूट थांबवायलाही सक्षम नाही.'