आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prisoners In Rajsthan Serve Cow : Open Prison Alternative Cow Shade

राजस्थानातील कैदी करणार गोमातेची सेवा : खुल्या तुरुंगाला पर्याय गोशाळेचा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - तुरुंगात ठरावीक वर्षे शिक्षा भोगलेले राजस्थानातील कैदी आता गोशाळेत गायींची देखभाल करणार आहेत. राजस्थानचे मुख्य सचिव सीके मॅथ्यू यांनी याविषयी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अशोक संपतराम यांना पत्र पाठवले आहे. जयपूरमधील हिंगोनिया गोशाळेपासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील इतर मोठ्या गोशाळांना खुल्या तुरुंगाचे स्वरूप देण्याचा प्रस्ताव आहे.

खुल्या तुरुंगाचे रूप देणार
राजस्थानचे महाधिवक्ता जी. एस. बाफना म्हणाले की, ठरावीक काळ शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांची संख्या खूप आहे. आता त्यांना खुल्या जेलमध्ये पाठवायला पाहिजे. पण खुल्या तुरुंगांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे हिंगोनिया गोशाळेची दुरुस्ती, बांधकाम आणि गायींच्या देखभालीसाठी या कैद्यांना तेथे पाठवण्यात येणार आहे. यामुळे कैद्यांना खुल्या वातावरणात काम केल्याचा अनुभव मिळणार आहे.

कैद्यांची विचारसरणी बदलेल
जेलचे डीजी ओमेंद्र भारद्वाज म्हणाले की, हिंगोनिया गोशाळेत कैद्यांना पाठवण्यासाठी ते तयार आहेत. खुल्या तुरुंगात कैदी कुटुंबासोबत राहत असतो. त्यामुळे अशी व्यवस्था झाल्यास तेथे कैद्यांना पाठवण्यास काही हरकत नाही. यामुळे कैद्यांची विचारसरणीही सकारात्मक होईल.