आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुलचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी बहिण प्रियंका यूपीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची बहिण प्रियंका गांधी धावून आल्या आहेत. कॉंग्रेस आणि त्यातल्या त्यात राहूलसाठी अतिशय प्रतिष्ठेची बनलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रियंका गांधी यांनी आजपासून तीन दिवसांचा उत्तर प्रदेश दौरा आरंभला आहे.
अमेठी आणि रायबरेलीवर त्या लक्ष केंद्रित करणार आहेत. १६ जानेवारी रोजी सकाळी फुरसतगंज विमानतळावर आगमन होताच त्या थेट अमेठीकडे रवाना होतील. तिथे चार विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतील. १८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता बछरांवा आणि १०.३० वा. हरचंदपुर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर त्या दिल्लीला परतणार आहेत.
उत्तर प्रदेशात राहुल गांधीच्या मदतीला प्रियंका राजकीय मैदानात