आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षातील गटबाजी रोखण्यासाठी प्रियांका नेमणार भरारी पथके

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कॉंग्रेस पक्षात गटबाजी करून फूट पाडणा-यांना पकडण्यासाठी जागोजागी भरारी पथके नेमून त्यांना गुप्त कोड देण्यात येईल, असा इशारा प्रियांका गांधी यांनी दिला आहे.
प्रियांका गांधी सध्या अमेठीच्या दौ-यावर आहेत. तिलोई विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसमोर मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, 'आपसातील मतभेद दूर सारून पक्षाला विजयी करण्यासाठी काम करा. यापुढे पक्षात गटबाजी सहन केली जाणार नाही. गटबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक हेर यंत्रणा काम करेल.'
दरम्यान, कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची बहिण प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात धावून गेल्या, पण त्यांना तिथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. कॉंग्रेस आणि त्यातल्या त्यात राहूलसाठी अतिशय प्रतिष्ठेची बनलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रियंका गांधी यांनी आजपासून तीन दिवसांचा उत्तर प्रदेश दौरा आरंभला आहे.
सोमवारी सकाळी रायबरेली जिल्ह्यातील फुरसतगंज विमानतळावरून मुंशीगंज गेस्ट हाउसकडे प्रियंका यांचा ताफा रवाना झाला आणि लगेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ताफा अडवून घोषणाबाजी सुरु केली. स्वच्छ प्रतिमा असणा-यांनाच उमेदवारी द्या, अशी मागणी कार्यकर्ते करीत होते. यावर आपण विचार करू असे आश्वासन प्रियंका यांनी दिले.
राहुलचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी बहिण प्रियंका यूपीत