आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका गांधीवर सर्जरी; सोनियांसह राहुल पोहचले रुग्णालयात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्रियांका गांधींवर सोमवारी एक सर्जरी करण्‍यात आली. गंगाराम रुग्णालयात डॉ. प्रविण भाटिया यांच्या नेतृत्त्वाखाली प्रियांकाच्या पित्ताशयावर एक छोटीशी सर्जरी करण्‍यात आली. सर्जरी यशस्वी झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

रुग्णायालयाचे व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ.डी.एस. राणा यांनी सांगितले की, प्रियांकाच्या पित्ताशयात दगड (पथरी) असल्याचे एक वैद्यकीय चाचणीत स्पष्‍ट झाले होते. त्यानंतर सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीसह राहुल गांधींनी रुग्णालयत जावून प्रियांकांची भेट घेतली.