आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Gandhi Soon To Decide On Campaign For Rahul Gandhi

कॉंग्रेसच्‍या युवराजासाठी आता राजकन्‍या प्रियंकाही उतरणार प्रचारात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः उत्तर प्रदेशातील निवडणूका सर्वच राजकीय पक्षांसाठी एक मोठे आव्‍हान असते. निवडणुकांमध्‍ये उत्तर प्रदेशचे महत्त्वही तसेच आहे. यावेळीही आगामी विधानसभा निवडणूक अनेकांसाठी प्रतिष्‍ठेचा मुद्दा बनली आहे. कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी हे त्‍यापैकीच एक. परंतु, या युवराजासाठी आता कॉंग्रेसची राजकन्‍या प्रचारात उतरली आहे. राजकारणात प्रवेश करण्‍याबाबत निर्णय घेतलेला नसला तरीही भावासाठी काहीही करण्‍यासाठी तयार असल्‍याचे प्रियंका गांधी-वधेरा यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशसह 5 राज्‍यांमध्‍ये विधासभेच्‍या निवडणुका होत आहेत. समस्‍त गांधी कुटुंबिय प्रचारात उतरले आहेत. सोनिया गांधी या उत्तराखंडमध्‍ये आहेत. तर राहुल गांधीवर उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. त्‍याच्‍यासोबत प्रियंकाही उत्तर प्रदेशच्‍या दौ-यावर आहेत. प्रियंकाने अमेठी आणि राय बरेली भागात दौरा केला. त्‍यांना राजकारणात प्रवेशाबाबत विचारले असताना त्‍या म्‍हणाल्‍या, मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. राहुल आणि मी चर्चा करुन यासंदर्भात ठरवू. माझ्या भावासाठी मी काहीही करु शकते. त्‍याला माझी जशी गरज असेल तशा पद्धतीने मी त्‍याला मदत करेन. माझी किती गरज आहे, हेदेखील तो जाणतो. सध्‍या मी या निवडणुकीवर लक्ष ठेवणार आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्‍या क्षेत्रांमध्‍ये मी दौरा करुन पाहणी करणार आहे. मी प्रचार करावा, असे राहुलला वाटल्‍यास मी प्रचारातही उतरेन.
अमेठीमध्‍ये पाय ठेवताच प्रियंका गांधी यांना महिलांच्‍या नाराजीचा सामना करावा लागला. राय बरेलीकडे जात असतना शीना टेक्‍स्‍टाईल मिलच्‍या 200 महिलांनी प्रियंका यांना रोखले. प्रियंकाने त्‍यांच्‍यासोबत चर्चा केली. मिल बंद झाल्‍यामुळे बेरोजगारीचे संकट आल्‍याचे या महिलांनी त्‍यांना सांगितले. ही मिल पुन्‍हा सुरु करण्‍यासाठी मदत करावी, अशी मागणीही या महिलांनी केली.
युपी निवडणूकः राहुल गांधींची प्रतिष्‍ठा पणाला
'सोनिया आणि राहुल गांधींमध्‍ये मतभेद'
शनीमुळे वर्ष 2012 मध्‍ये राहुल द्रविडला करावा लागेल संघर्ष
भाजपकडून लोकपालची हत्या- राहुल गांधी यांची टिका
उत्तर प्रदेशात राहुल गांधीच्या मदतीला प्रियंका राजकीय मैदानात