आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिमल्याजवळ बनतोय प्रियंका गांधीचा साडेचार एकरात आलिशान बंगला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचाल प्रदेशची राजधानी शिमला पासून १२ किलोमीटर दूरवर छाडब्रा गावांत प्रियंका गांधी वढेरा हिच्या स्वप्नातील आलिशान बंगल्याचे काम पुन्हा एकदा सुरु झाले आहे. सुमारे साडेचार एकरात हा बंगला असून त्याचा आतील व बाहेरील संपूर्ण चेहराच बदलण्याचे काम सुरु आहे. या बंगल्याचे काम आता पर्वती भागातील गरज ओळखून बांधण्यात येत आहे.
प्रियंकाच्या या बंगल्याला गेल्या वर्षी संपूर्णपणे पाडण्यात आले होते. त्यानंतर आता मागील आठवड्यात त्याचे काम सुरु झाले आहे. प्रियंकाने मागील दोन महिन्यापूर्वी येऊन एक डिझाईन पंसत केले होते. प्रियंकाचा हा बंगला नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन बनविण्यात येत आहे. याचबरोबर या बंगल्याभोवती चेरी आणि सफरचंदाची बाग असणार आहे.
गांधी परिवाराशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, या बंगल्याच्या बांधकामासाठी सीमेंटचा वापर कमीतकमी करण्यात येणार असून बहुतांश ठिकाणी लाकडाचा वापर करण्यात येणार आहे. पर्वतीय भाग असल्याने या बंगल्याची जमिनीतील खोली भरपूर ठेवली आहे. याआधी ड्राइंग रुम ठेवल्याने प्रियंकाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बंगल्याचे डिझाईन बदलण्यात आले होते. आता बंगला पूर्ण करण्यासाठी लागणा-या सर्व वस्तूंची जुळवाजुळव केली असल्याचे सांगण्यात आले.
राहुल गांधी आणि दोन पर्याय