आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल गांधीच्या आधीच प्रियंका राजकारणात सक्रीय, आठवड्याला भरणार दरबार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काँग्रेसचे खासदार व महासचिव राहुल गांधी यांचा पक्षात व सरकारमध्ये कोणती भूमिका घ्यावी याचा निर्णय झाला नसला तरी, त्यांची बहिण प्रियंका गांधी हिने राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत.
शनिवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनाच्या माहितीनुसार, प्रियंका गांधी आता दर बुधवारी रायबरेली लोकसभा मतदारसंघातील लोकांशी संवाद साधतील. आपली आई सोनिया गांधी रायबरेलीतून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत, त्या लोकांसाठी प्रियंका खास जनता दरबार भरविणार आहे.
सोनिया गांधी काही दिवसापूर्वी आजारी पडल्या होत्या. त्यांची तब्बेत आजकाल पुरेशी ठीक नसते. त्यामुळे त्या रायबरेली लोकसभामतदारसंघातील लोकांशी संवाद साधू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या आईच्या कामाची कमतरता भरुन काढण्यासाठी लेक प्रियंका मदत करणार आहे.
प्रियंका गांधी यांनी याआधीही रायबरेली व अमेठी भागात प्रचारदौरे केले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघात जबरदस्त प्रचार केला होता. मात्र रायबरेली, अमेठी व सुल्तानपुर विधानसभेच्या जागा वगळता काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडणूक हरले होते.
शिमल्याजवळ बनतोय प्रियंका गांधीचा साडेचार एकरात आलिशान बंगला