आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाशीचा निषेध करणा-या मानवाधिकार कार्यकर्त्यांना बजरंग दलाकडून मारहाण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संसदेवर हल्ल्यातील दोषी अफझल गुरुला फाशी दिल्याच्या विरोधात आज दुपारी जंतर-मंतरवर गौतम नवलखा, हरीश सुंदरम यांच्यासह अनेक मानवाधिकार कार्यकर्ते विरोध करण्यासाठी दाखल झाले. त्यांच्याबरोबर काश्मीरमधील 20-25 तरुण हातात बॅनर-पोस्‍टर घेऊन विरोध करीत होते. या दरम्यान, बजरंग दलाचे कार्यकर्ते तेथे पोहचले व शांततेने विरोध करणा-या लोकांना उठून जाण्यास सांगितले.

याचवेळी या दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांत हाणामारी सुरु झाली. त्याचवेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मानवाधिकार कार्यकर्ता गौतम नवलखा यांच्या चेह-यावर काळे फासले व त्यांना मारहाण केली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यानंतर आपला मोर्चा तेथील मुलींवर व महिलांकडे वळविला. या महिलांच्या केसांना पकडून त्यांना रस्त्यावरुन ओढत नेले व मारहाण केली.