आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजपाक्षे यांच्या विरोधात चेन्नई, दिल्लीत निदर्शने

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोधगया - श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपाक्षे यांनी पत्नी शिरांथी यांच्यासह पवित्र बोध गयेला शुक्रवारी भेट देऊन महाबोधी मंदिरात प्रार्थना केली. सपत्नीक आलेल्या राजपाक्षे यांना गयेमध्ये तमिळींवरील अन्यायाचा निषेध म्हणून करण्यात आलेल्या निदर्शनांचाही अनेक ठिकाणी सामना करावा लागला. चेन्नई, दिल्लीसह अनेक ठिकाणी त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले.

राजपाक्षे शुक्रवारी पत्नी, 70 वर्षीय आईसह दोन दिवसांच्या खासगी भारत दौ-यावर दाखल झाले. त्यांची ही भेट धार्मिक पर्यटनाच्या स्वरूपाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी त्यांचे चेन्नई आगमन होताच त्यांना राजकीय पक्षांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. द्रमुकसह माकपचाही निदर्शनात सहभाग होता. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. त्यानंतर ते बिहारमध्ये दाखल झाले. सायंकाळी त्यांनी तिरूपतीचे दर्शन घेतले. राजपाक्षे यांच्या दौ-याचे पडसाद राजधानी दिल्लीतही उमटले. त्यांच्या दौ-याला विरोध करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या दिशेने नेण्यात येणा-या एका मोर्चाला पोलिसांनी रोखले. हा मोर्चा एमडीएमके प्रमुख वायको यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. वायको यांना समर्थकांसह पोलिसांनी ताब्यात घेतले.