आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pune Blasts A Planned, Coordinated Act: Union Home Secy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे : स्फोट नियोजित व संघटित कृत्य- केंद्रीय गृहसचिव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पुण्यात बुधवारी रात्री घडवून आणलेले कमी तीव्रतेचे साखळी स्फोट हे नियोजितपणे व संघटितपणे केलेले कृत्य असून, या घटनेमागे दहशतवादीसारख्या संघटनांचा हात असू शकतो, असे केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांनी आज सकाळी सांगितले.
सिंग म्हणाले, या स्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला होता का याची तपासणी करण्यात येत आहे. चार झालेल्या स्फोटातून व दोन निकामी केलेल्या स्फोटकाची फॉरेन्सिक सायन्सचे तज्ञ तपासणी करीत आहेत.
हा नियोजित व संघटित कृत्य असल्याचे सांगताना सिंग म्हणाले, की जे चार स्फोट झाले ते ५०० मीटरच्या अंतरावर झालेले आहेत. तसेच हे सर्व स्फोट ४५ मिनिटांच्या अंतरात घडवून आणले आहेत. यावरुन कोणी एकटा हे कृत्य घडवूच शकत नाही. त्यामुळे याबाबत प्रत्येक शक्यता पडताळून पाहण्यात येत आहेत. या स्फोटाच्या तपासासाठी देशातील सर्व यत्रंणा तपासाच्या कामाला लागल्या असल्याचेही सिंग यांनी स्पष्ट केले.
गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्फोटाबाबत अजून नेमकी माहिती व काहीही धागेदोरे मिळाले नसल्याचे म्हटले आहे.
शिंदे यांनी आज सकाळी आकराच्या सुमारास गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिका-यांची बैठक बोलावली आहे. यात रॉ, आयबी यांच्या अधिका-यांचाही समावेश आहे.