आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबमध्ये भाजी विक्रेता झाला करोडपती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बठिंडा ( पंजाब ) - येथील भाजी विकणा-या भगतरामचे नशीब फळफळले असून त्याला 1 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. शुक्रवारी सकाळी भगतराम आणि त्याच्या नातेवाइकांना लॉटरी जिंकल्याचे कळले आणि त्याचा प्रथम विश्वास बसला नाही. त्यानंतर त्याचे
अभिनंदन करण्यासाठी लोकांची रीघ लागली होती.
भगतराम (35) हरियाणाच्या सिरसा जिल्ह्याच्या कालावली भागातील रहिवासी आहे. भाजी व्यवसायाबरोबर तो 15 वर्षांपासून नियमितपणे लॉटरीचे तिकिट खरेदी करून नशीब आजमावत होता. एवढ्या वर्षांत एकदाही लॉटरी न लागल्याने तो निराश होता, मात्र त्याने तिकीट खरेदी करणे सुरूच ठेवले होते. भटिंडामध्ये काही कामानिमित्त गेलो तेव्हा रस्त्यावरील लॉटरी विक्रेत्याकडून लोहडी बंपर लॉटरीचे तिकिट खरेदी केले आणि नशीब उजाडले, असे तो म्हणाला. लॉटरीच्या पैशातून मुलांचे शिक्षण आणि घराची स्थिती सुधारू असे भगतराम म्हणाला. भगतरामला दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलांचे शिक्षण आणि घरची परिस्थिती सुधारण्याबरोबर आणखीही काही स्वप्न आहेत, मात्र ते आत्ताच सांगणार नाही, असे भगतराम म्हणतो.