आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Punjab To Bear Expenses On Transportation Of Bodies: Badal ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृतदेह सरकारी खर्चाने भारतात आणू : बादल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - अमेरिकेत गुरुद्वारातील गोळीबारात बळी पडलेल्यांचे मृतदेह पंजाब सरकारच्या खर्चाने भारतात आणण्यात येतील, अशी घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी केली.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांच्या नातेवाइकांचे सांत्वन करताना त्यांनी आश्वासन दिले की, मृतदेह भारतात आणून अंत्यसंस्कारांसाठी त्यांच्या गावांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्थाही राज्य सरकार करणार आहे. अमेरिकेतील भारताच्या राजदूत निरुपमा राव यांच्याशी बादल यांनी फोनवरून संपर्क साधला आणि मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याची माहिती दिली.