आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Punjab Vidhansabh Election Two Thousand Loss To Election Shyamlal Ghandhi

2 हजार रुपयांत निवडणूक लढवणारे श्यामलाल गांधी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर: निवडणुकीत केला जाणारा खर्च निवडणूक आयोगापासून कसा लपवावा या विवंचनेत सर्वच उमेदवार असताना पंजाब विधानसभा निवडणुकीतील एक उमेदवार श्यामलाल गांधी फक्त 2 हजार रुपये खर्च करून ही निवडणूक लढवणार आहेत.
‘धोती पकड’ नावाने प्रसिद्ध असलेले आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले गांधी मूळचे उत्तर प्रदेशातील गोंडा येथील आहेत. ते पूर्वी कापड गिरणीत विणकर होते. त्यांच्याकडे फक्त एक धोतर आणि एकच टोपी आहे. ते अर्धेच धोतर नेसून स्नान करतात आणि उरलेले अर्धे धोतर स्नान झाल्यावर नेसतात. अर्धे ओले धोतर वाळेपर्यंत ते उन्हात धरून ठेवतात.
ते म्हणाले की, त्यांच्याकडे फक्त 2 हजार रुपये एवढी संपत्ती आहे. त्यातील 50 रुपये रिक्षासाठी आणि 75 रुपये सुरक्षारक्षकांच्या दुचाकीत पेट्रोल टाकण्यासाठी खर्च झाले आहेत. विशेष म्हणजे ते सायकलवरून फिरतात आणि त्यांचे रक्षक मोटारसायकलवर त्यांच्या मागोमाग येतात. ब-याचदा हे रक्षक त्यांच्यासोबत रिक्षातूनही फिरतात.
येथेही कमी खर्च
लोकसभा निवडणुकीत फक्त 700 रुपये त्यांनी खर्च केले होते आणि त्यांना 1494 मते मिळाली होती. निवडणूक लढवल्यामुळे त्यांची नोकरीही गेली होती.