आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Queen's Baton Relay: 3 Top Cwg Officials Named In Chargesheet ‎

सुरेश कलमाडींना वाचवण्याच्या तयारीत आहे सीबीआय ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कॉमनवेल्थ घोटाळ्याचा तपास करणारे सीबीआय काँग्रेस सदस्य सुरेश कलमाडी यांना वाचवण्याच्या तयारीत दिसत आहे. सीबीआयने कॉमनवेल्थ क्वीन्स बॅटन रिले संदर्भात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात कॉमनवेल्थ गेम्स आयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे नाव नाही.
सीबीआयने याबाबतीत सांगितले की, या घोटाळ्यात कलमाडी यांचा हस्तक्षेप आहे, असे कोणतेही पुरावे नाहीत. आरोपपत्रात आयोजन समितीचे तीन अधिकारी आणि एका भारतीय व्यापाराचे नाव आहे. सीबीआयने या घोटाळ्यात एम. फिल्म्स फर्मचे मालक आशीष पटेल आणि आयोजन समितीचे अधिकारी टी.एस दरबारी, संजय महेन्द्रू व एम जयचंद्रन यांना आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे.
या सर्वांवर फसवेगीरीचे आरोप लावण्यात आले आहेत. २०१० साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये सर्वात पहिले क्वीन्स बॅटन रिलेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक प्रकारची हेराफेरी झाल्याचे निदर्शनास आले होते. नोव्हेंबर २०१०मध्ये याबातीत सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आयोजन समितीच्या नियमांचे उल्लंघन करून काही कंपन्यांना फायदा करून देण्यात आल्याचे सांगितले होते.
कलमाडी ‘केस’बाबत आयओसीलाही माहिती हवी
मी लंडनला जाणारच - कलमाडी