आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी \'भैय्या\' तर, नरेंद्र मोदी म्हणजे \'हुकुमशाहीची चीनी भिंत\'- शोभा डे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा- प्रसिद्ध लेखिका शोभा डे 'ताज साहित्य संमेलना'मध्ये सहभागी झाल्या असून, त्यांनी तेथे राजकीय बँटिंग केली आहे. शोभा डे यांनी राहुल गांधी व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना वेगवेगळी करीत नव्या वादाला तोंड फोडले आहे. राहुल गांधी हे 'भैय्या' असून ते भैय्या म्हणूनच राहिले आहेत. तर, नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधान केल्यास भारतात चीनसारख्या हुकुमशाहीची भीती असल्याचे वादग्रस्त वक्तव्य शोभा डे यांनी केले आहे. शनिवारी संमेलनाचा दूसरा दिवस असून, जाहीरात व चित्रपट क्षेत्रातील निर्माते प्रल्हाद कक्‍कड़ यांच्यातील चर्चेदरम्यान हा मुद्दा डे यांनी उपस्थित केला.

शोभा यांनी राहुल गांधींवर भाष्य करताना म्हटले की, 'देशाला एक भैय्या आणि जिजाजी (रॉबर्ट वद्रा) चालवत आहेत. भैय्याजी अजूनही मम्माच्या हाताला पकडून चालत आहे. त्यांचे वडिल राजीव गांधी यांनाही राजकारणाशी काहीही देणेघेणे नव्हते. मात्र आईच्या (इंदिरा गांधी) हत्येनंतर अचानकपणे पंतप्रधानपद मिळाले. राजीव गांधी जोपर्यंत पंतप्रधानपदी राहिले तोपर्यंत देश ‘बनाना’ बनून राहिला होता. राजीव गांधी नेहमी-नेहमी म्हणायचे 'ये बनाना है, वो बनाना है'. मात्र झाले काहीच नाही. त्यामुळे देश तसाच 'बनाना' राहिला. (रॉबर्ट वद्रा यांनी नुकतेच भारत देश व येथील लोकांबाबत 'रिपब्लिक बनाना' असे वक्तव्य केले होते. तो धागा पकडत शोभा डे यांनी पकडला).

ताज साहित्य संमेलनात आणखी कोण-कोण काय म्हणाले वाचण्यासाठी पुढे क्लिक करा...