आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Became Party Deputy President Because Of Priyanka Gandhi

प्रियंकाच्‍या सांगण्‍यावरून राहुल गांधी बनले उपाध्‍यक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- राहुल गांधी यांनी पक्षातील मोठी जबाबदारी घ्‍यावी म्‍हणून होत असलेली गेल्‍या अनेक दिवसांची मागणी अखेर पूर्ण झाली. प्रत्‍येकवेळेस राहुल गांधी यासाठी तयार होत नसत. स्‍वत: पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्‍यांना सरकारमध्‍ये सहभागी होण्‍याचे अपील केल्‍यानंतरही ते तयार झाले नव्‍हते.

शेवटी असं काय झालं की राहुल गांधी यांनी अचानक पक्षाचे उपाध्‍यक्षपद स्‍वीकारले. एका वाहिनीने दिलेल्‍या वृत्तानुसार प्रियंका यांनी यामध्‍ये महत्‍वाची भूमिका निभावली आहे. प्रियंका यांच्‍या सांगण्‍यावरूनच राहुल पक्षातील मोठी जबाबदारी स्‍वीकारण्‍यास तयार झाले.

गेल्‍या अनेक दिवसांपासून प्रियंका यांनी राहुलने मोठी जबाबदारी स्‍वीकारावी म्‍हणून त्‍यांची मनधरणी करीत होत्‍या. उल्‍लेखनीय म्‍हणजे जयपूर येथील राष्‍ट्रीय चिंतन शिबिरात शनिवारी कॉंग्रेस कार्य समितीच्‍या बैठकीत राहुल गांधी यांना पक्षाच्‍या उपाध्‍यक्षपदी नेमण्‍यात आले आहे.

या बैठकीत संरक्षण मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते एके अँटोनी यांनी राहुल यांना उपाध्‍यक्ष बनवण्‍यात यावे असा प्रस्‍ताव मांडला. जो सर्वसंमतीने स्‍वीकारला गेला. आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्‍हणून कॉंग्रेस घोषित करेल काय हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरेल.