आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rahul Gandhi Criticizes Bjp Lead Government In Karnataka

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्नाटक सर्वात भ्रष्ट राज्‍य : राहुल गांधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हुबळी । देशात भाजपशासित कर्नाटकसारखे अन्य दुसरे राज्य भ्रष्ट नाही. भाजप सरकार केवळ भ्रष्टाचार वाढवण्यावर भर देत आहे, असा आरोप कॉँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल दोन दिवसांच्या कर्नाटक दौ-यावर आले आहेत. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी भाजप सरकारला सत्तेवरून बाहेर फेकण्याचे आवाहन केले.
युवक कॉँग्रेसला संबोधित करताना राहुल म्हणाले की, अर्धे राज्य दुष्काळाच्या खाईत लोटले असताना भाजप भ्रष्टाचार आणि आपआपसातील मतभेदामध्ये व्यग्र आहे. केंद्र सरकार लोकपयोगी योजना राबविण्यासाठी राज्याला पैसा पुरविते, मात्र हा पैसा सर्व सामान्यापर्यंत पोहोचला जात नाही.भाजप नेते भ्रष्टाचारामध्ये गुंतल्याचा संदर्भ देत राहुल म्हणाले की, भाजप नेते श्रीमंत होत असून सामान्य जनता गरीब होत आहे. सत्तेत परत येण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.