आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi First Speech After Being Vice President

ज्‍यांनी बॅडमिंटन शिकविले, त्‍यांनीच केली आजीची हत्‍याः राहुल गांधी झाले भावूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- जयपूर- कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष म्‍हणून घोषणा झाल्‍यानंतर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जयपूरच्‍या चिंतन शिबिराच्‍या समारोपाला पहिले भाषण केले. राहुल गांधी यांनी यावेळी सर्व कॉंग्रेसजनांचे आभार मानलेच, परंतु, भाषणादरम्‍यान ते अतिशय भावूक झाले. त्‍यांच्‍या कुटुंबियांवर काही कठीण प्रसंग ओढावले. त्‍या घटनांच्‍या स्‍मृति ताज्‍या करताना राहुल गांधी म्‍हणाले, ज्‍या पोलिसांनी मला बॅडमिंटन खेळणे शिकविले, त्‍यांनीच माझ्या आजीची हत्‍या केली. त्‍यावेळी मी माझे पिता राजीव गांधी यांना रडताना पाहिले. काल मी माझ्या आईला रडताना पाहिले. काल रात्री ती माझ्या जवळ आली आणि रडू लागली. सत्ता हे विष आहे, याची जाणिव असल्‍यामुळेच माझी आई रडली. परंतु, अशा विषावर एकच उपाय आहे. सत्तेचा वापर गोरगरीबांना त्‍यांचा हक्‍क मिळवून देण्‍यासाठी करावा, असे तिने मला सांगितले. हा क्षण मी कधीच विसरु शकणार नाही, असे राहुल गांधी म्‍हणाले.