आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेठीशी राजकीय नव्‍हे तर कौटुंबिक नाते- राहुल गांधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेठी- अमेठीशी माझे राजकीय नाही तर कौटुंबिक नाते आहे. मला जेव्‍हा ही संधी मिळते तेव्‍हा मी इथे येतो. हे नाते प्रेमाचे आहे. हे माझे कुटूंब आहे आणि मी कधीच अमेठी सोडणार नाही, असे भावनात्‍मक उद्‍गार कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेठी येथे काढले. कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष झाल्‍यानंतर ते पहिल्‍यांदाच आपल्‍या मतदार संघात आले होते. यावेळी कार्यकर्त्‍यांनी त्‍यांचे जल्‍लोषात स्‍वागत केले.

ते म्‍हणाले, अमेठीच्‍या विकासासाठी केंद्राकडून जितकी होईल तितकी मदत मी करतो. मात्र, राज्‍यात दुस-या पक्षाचे सरकार असल्‍यामुळे अपेक्षेनुसार विकास होत नाही.