आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- विद्यार्थ्यांसाठी युपीए सरकारने 2011 मध्ये 'आकाश' या स्वस्त टॅबलेटची योजना आखली होती. परंतु, या योजने अनेक त्रुटी होत्या. अजुनही लाखो विद्यार्थ्यांच्या हाती 'आकाश' आलेले नाही. कॉंग्रेसने 'आकाश'चा मोठा गाजावाजा केला होता. परंतु, आता कॉंग्रेसचे उपाध्यक्ष झालेल्या राहुल गांधी यांनी 'आकाश'पासून स्वतःला दूर ठेवले आहे. ही योजना मी आणली नव्हती. ज्यांनी आणली, त्यांनाच याबाबत विचारा, असे राहुल गांधी म्हणाले.
दिल्लीत जवाहर भवन येथे एका परिसंवादात एका विद्यार्थ्याने आकाश टॅबलेटबाबत विचारणा केली. जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट आतार्पंत किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे, असा प्रश्न राहुल गांधींना त्याने केला. त्यावर राहुल गांधी महणाले, ज्या जेंटलमनची ही कल्पना होती, त्यांनाच विचारा. ही योजना मी आणली नव्हती.
केंद्र सरकारची एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना म्हणून 'आकाश'चा प्रचार करण्यात येत होता. 'युनो'मध्येही 'आकाश'ची दखल घेण्यात आली होती. परंतु, 'आकाश'ची पहिली आवृत्ती अपयशी ठरली होती. त्यानंतर 'आकाश-2' सादर करण्यात आला. सिब्बल यांचे खाते बदलल्यानंतर पल्लम राजू यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागचा कारभार आला. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते 'आकाश-2' सादर करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.