आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Starts Its Loksabha Election Programe

राहुल गांधीच्या लोकसभा निवडणूकीच्‍या कार्यक्रमास प्रारंभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधींनी आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या पदाधिका-यासोबत बैठका घेऊन ते विभागनिहाय पक्षाची स्थिती जाणून घेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून राहुल जोरदार होमवर्क करत आहेत, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. निवडणूकपूर्व युती, आघाडीबाबत पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी आठ फेब्रुवारीला संबंधित समितीच्या पदाधिका-याची बैठक होणार आहे.

राहुल यांनी निवडणूक तयारीसंदर्भात सर्व प्रदेश, विभागांतून अहवाल मागितला होता. गुजरात वगळता इतर विभागांनी त्यांचा अहवाल सादर केला असून त्यात त्या विभागातून संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी, त्या मतदारसंघात काँग्रेस व इतर पक्षांची सद्य:स्थिती तसेच मतदारसंघातील जातीय समीकरणांची माहिती देण्यात आली आहे. काँग्रेसच्या रणनीती टीममध्ये सहभागी असलेल्या एका नेत्याने सांगितले की, लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा होमवर्क सुरू झाला आहे. गेल्या काही वर्षांतील निवडणुकीचा आढावा घेऊन 2014 ची तयारी केली जात आहे. राहुल गांधी एक ना एक जागेची माहिती जाणून घेत असून त्यानंतरच पक्षाचा उमेदवार व इतर पक्षांशी आघाडी, युतीबाबत निर्णय घेतला जाईल.

आठ ऑगस्टला ठरणार युतीचे धोरण
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निवडणूकपूर्व आघाडी, युतीबाबत चर्चा करण्यासाठी 8 फेब्रुवारीला औपचारिक बैठक होणार आहे. संरक्षणमंत्री व या समितीचे प्रमुख ए. के. अँटोनी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल,असे सूत्रांनी स्पष्ट केले.