Home »National »Other State» Rahul Gandhi's Role In Helicopter Sacm Is Suspected Says Kirti Azad

हेलिकॉप्‍टर घोटाळयात राहुल गांधींची भूमिका संशयास्‍पद- आझाद

वृत्तसंस्‍था | Feb 20, 2013, 14:16 PM IST

  • हेलिकॉप्‍टर घोटाळयात राहुल गांधींची भूमिका संशयास्‍पद- आझाद

दरभंगा- हेलिकॉप्‍टर खरेदी घोटाळयात कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांची भूमिका संशयास्‍पद असून याप्रकरणी त्‍यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार किर्ती आझाद यांनी केली आहे. राहुल यांचे खासगी सचिव कनिष्‍क सिंग यांचे नाव याप्रकरणी समोर आले आहे. त्‍यामुळे त्‍यांची राहुल यांची यातील भूमिका तपासली पाहिजे, असे त्‍यांनी म्‍हटले.

किर्ती आझाद हे आपल्‍या दरभंगा मतदार संघाच्‍या दौ-यावर आले होते. ते म्‍हणाले, सीबीआयचा आतापर्यंतचा अनुभव चांगला नाही. त्‍यामुळे या प्रकरणाची उच्‍च न्‍यायालयाच्‍या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे. हेलिकॉप्‍टर घोटाळा हा बोफोर्स घोटाळयापेक्षाही मोठा आहे. या घोटाळयात जेवढया रकमेची लूट करण्‍यात आली आहे. तो पैसा जर प्रामाणिकपणे खर्च केला असता, तर देशाच्‍या प्रगतीला त्‍याचा निश्चितच फायदा झाला असता, असे ते म्‍हणाले.

युपीएच्‍या काळात 2 जी स्‍पेक्‍ट्रम, राष्‍ट्रकूल आणि कोळसा घोटाळे उजेडात आले. या सरकारच्‍या कार्यकाळातच पेट्रोलच्‍या किंमती सातत्‍याने वाढत असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले.

Next Article

Recommended