आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी, रेल्‍वेमंत्री बंसल यांचे तिकीट कन्‍फर्म करण्‍यासाठीही झाली लाचखोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- रेल्‍वे तिकीट आरक्षण यंत्रणेला दलालांनी अक्षरशः पोखरुन काढले आहे. याचे उत्तम उदाहरण गुजरातमध्‍ये समोर आले आहे. दलालांनी चक्‍क राहुल गांधी आणि पवन बंसल यांच्‍या नावाची दोन तिकीटे प्रतिक्षा यादीतून कन्‍फर्म केली. यासाठी तब्‍बल 5 हजार रुपये दलालांनी घेतले. महत्त्वाचे म्‍हणजे यासाठी थेट दिल्‍लीपर्यंत दलालांनी फिल्डिंग लावली.

'दिव्‍य भास्‍कर'ने हे प्रकरण उघडकीस आणले आहे. प्राप्‍त माहितीनुसार, 12 फेब्रुवारीला राजधानी एक्‍स्‍प्रेसने दिल्‍लीपर्यंत प्रवास करण्‍यासाठीचे हे तिकीट 11 फेब्रुवारीला बुक करण्‍यात आले होते. त्‍यात प्रवासी म्‍हणून राहुल गांधी आणि पवन बंसल यांची नावे होती. प्रतिक्षा यादीत 44-45 असा क्रमांक होता. हे तिकीट कन्‍फर्म करण्‍यासाठी दलालांचे नेटवर्क सक्रीय झाले. सुरतमध्‍ये बसलेल्‍या दलालांनी दिल्‍लीपर्यंत फिल्डिंग लावून काम फत्ते केले. त्‍यासाठी प्रतिप्रवासी 2500 रुपये घेण्‍यात आले.

मुख्‍य जनसंपर्क अधिकारी शरदचंद्र यान यांच्‍याशी याबाबत चर्चा करण्‍यात आली. पुरावे प्राप्‍त झाल्‍यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्‍यात येईल, असे त्‍यांनी सांगितले.