आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Budget Issue Maharashtra MP Meet To Railway Minister Pavankumar Bansal

रेल्वेप्रश्नी पंतप्रधानांचा महाराष्ट्राच्या खासदारांना दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रेल्वे अर्थसंकल्पात अपेक्षाभंग झाल्याचे गाºहाणे मांडणाºया महाराष्ट्रातील खासदारांना शुक्रवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. रेल्वेप्रश्नी जरूर लक्ष घालू, अशी ग्वाही सिंग यांनी दिली. कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. अर्थसंकल्पात महाराष्ट्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याची तक्रार खासदारांनी केली. मुंबईतील सुमारे 80 लाख प्रवाशांना रोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अर्थसंकल्पात त्याविषयी काही ठोस असेल, अशी अपेक्षा होती; परंतु प्रत्यक्षात निराशा झाली आहे. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. त्यावर सिंग यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती पवार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. शिष्टमंडळात तारिक अन्वर, समीर भुजबळ, सुप्रिया सुळे, संजीव नाईक, संजय दिना पाटील, दिलीप गांधी, सुभाष वानखेडे, भावना गवळी, गणेश दुधगावकर, आनंद परांजपे यांचा समावेश होता.