आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेचा ई-तिकिटात विक्रम, एका दिवसात 5 लाख बुकिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय रेल्वेच्या नावावर ई-बुकिंगमध्ये नवा विक्रम नोंदला गेला आहे. एकाच दिवसात पाच लाखांहून अधिक ई-तिकिटांचे बुकिंग झाले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात आपलाच विक्रम रेल्वेने मोडला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पाेरेशनने (आयआरसीटीसी) 5.2 लाख ई-तिकिटांची नोंदणी केली. शुक्रवारी या विक्रमाची नोंद झाली. त्याअगोदर गेल्या वर्षी 7 जुलै रोजी एकाच दिवशी 4.96 लाख तिकिटांची नोंदणी झाली होती, असे आयआरसीटीसीच्या सूत्रांनी सांगितले. तत्काळ बुकिंगवरून आयआरसीटीसीवर टीका होत असतानाच विक्रमाची ही बातमी जाहीर झाली आहे. एकूण ई-तिकीट व्यवस्थेतील आरक्षणापैकी सध्या 48 टक्के एवढे बुकिंग केले जाते. अपग्रेडेशन कार्यक्रमाची अंमलबजावणी या वर्षीच्या शेवटी सुरू होईल. त्यातून सुमारे 1.2 लाख युर्जसना एकाच वेळी हाताळणे शक्य होणार आहे. सध्या ही क्षमता केवळ 40 हजार युर्जसची आहे.

रॅम 8 पटींनी वाढवली
आयआरसीटीसीने अलीकडेच आपल्या वेबसाइटच्या यंत्रणेची क्षमता वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. त्याचबरोबर डाटा साठवण्याच्या क्षमतेमध्येही वाढ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अगोदर रेल्वेकडे 8 जीबी रॅम एवढीच मर्यादित व्यवस्था होती. त्या व्यवस्थेत आता 64 रॅमपर्यंत वाढ होईल.

मिनिटाला 7000
आयआरसीटीसी संकेतस्थळाचा वापर नागरिकांकडून प्रचंड वाढला आहे. त्यामुळेच अपग्रेडेशनमुळे आता संकेतस्थळाच्या माध्यमातून दर मिनिटाला सुमारे 7 हजार 200 एवढे बुकिंग करणे शक्य होणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी संसदेत दिली होती. सध्या केवळ मिनिटाला दोन हजार एवढेच बुकिंग शक्य होते.